अहेरी वांगेपल्ली येथील घटना #jantechaawaaz#news#portal#

41

प्रतिनिधी//

*भाजपचे तालुका अध्यक्ष रविभाऊ नेलकुद्री, विनोद जिल्लेवार, टायगर ग्रुपचे साई तुलसीगारी व अहेरी पोलीस यांना तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी घेऊन जाणारे गायींना (जनावरे)वाचविण्यात यश!*












गडचिरोली जिल्ह्यातून अहेरीमार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे तस्करी करणाऱ्या ट्रकसह ३३ जनावरे भाजपा, टायगर ग्रुपचे कार्यकर्ते व अहेरी पोलिस यांनी वांगेपल्ली गावाजवळ सापळा रचून पकडली.

गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी मार्गे तेलंगणा राज्यात तस्करीसाठी जनावर तस्कर होणार असल्याची बातमी रविभाऊ नेलकुद्री व साई तुलसीगारी व अहेरी पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे वांगेपल्ली जवळ सापळा रचला.दरम्यान TS.01.UA.1698 क्रमांकाचा संशयीत ट्रक येतांना दिसून आला.

या ट्रकला थांबवून तपासणी केली असता,त्यामध्ये ३३ जनावरे दाटीवाटीने बेकायदेशीररित्या बांधलेल्या स्थितीत आढळून आले.त्यानंतर अहेरी पोलिसांच्या मदतीने वाहनासह जनावरे जप्त केली

*यावेळी अहेरी पोलिसांनी उत्तम सहकार्य केले