एटापल्ली तालुक्यात भाकपा व काँग्रेस मिळून करत आहे डॉ किरसाण यांचा प्रचार

238

एटापल्ली :आज इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री डॉक्टर नामदेव किरसान साहेब यांचा प्रचार करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील काँग्रेस व भारतीय काम्युनिष्ठ पक्षाचे नेत्यांनी विविध ग्रामीण ठिकाणी जाऊन भेट दिली यावेळी रमेश गंपावर तालुका अध्यक्ष काँग्रेस , काम्रेड सचिन मोतकुरवार तालुका सचिव भाकपा व नगरसेवक श्री किसनभाऊ हिचामी व काम्रेड आकाश तेलकुंतलवार व इतर कार्यकर्ते मिळून उडेरा, बुर्गी, कांदोळी, गुरुपल्ली, करेम, बिड्री, येमली, परमिली, कोरेली,तुमुरगुंडा, अश्या विविध गावात प्रचार केला यावेळी नागरिकांचा खूप उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि जो खासदार लपत्ता होता त्याला कायमचा लपत्ता करायचं निर्णय घ्यावा असं कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि एटापल्ली तालुक्यातून प्रचंड मताने लीड देण्यासाठी इंडिया आघाडी पूर्णपणे सक्षम आहे असे यावरून दिसलें……