जमात-ए-इस्लामी हिंद बल्लारपूर तर्फे अलहूदा मस्जिद येथे इफ्तार पार्टी संपन्न.

275

चंद्रपूर: संतोषी माता वार्ड येथील अलहूदा मस्जिद येथे दि.०७/०४/२०२४ रोज रविवारला सायंकाळी ६.३० वाजता जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष श्री कादर भाई यांचे अध्यक्षेखाली इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध समाजातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री वाजीत खान यांनी केले. इफ्तार पार्टी व पवित्र रमजानच्या रोजा बाबत इंजिनीयर नदीम खान यांनी प्रस्ताविक भाषणातून मार्गदर्शन केले. त्यांनी रोजा हे फक्त शरीराने उपाशी राहण्याकरिता नसून ते, डोळ्यांनी वाणीने, मनाने पवित्र आचरण करण्याकरिता रोजा पाळल्या जातो. रमजानचे काळातील रोजे हे मानवाच्या शारीरिक आणि आत्मिक शुद्धी करण्याकरिता असून समाजाच्या कल्याणा करिता आहेत असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिति म्हणून मराठा सेवा संघचे मा.मनोहर माडेकर, बल्लारपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष मा.भारत थुलकर, बालाजी मंदिर ट्रस्टचे सचिव मा. डॉ. श्रीनिवास थोटा, जे.बी.बी.एस विदर्भ ग्रुपचे अध्यक्ष मा. संतोष बेताल, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. राकेश सोमानी, माजी नगरसेवक मा. ॲड. पवन मेश्राम, बहुजन समाज पार्टीचे नेते मा. राजेश ब्राह्मणे, समाजसेवक मा. प्रशांत झांबरे, माजी नगरसेवक मा. सागर राऊत, माजी नगरसेवक मा. सरफराज शेख, सामाजिक कार्यकर्ता मा. नवनीत गोंगले, समाजसेवक मा. गोलू डोहणे, विशेष कार्यकारी अधिकारी मा.आसिफ शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विशेषता इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजापेक्षा विविध समाजातील मान्यवर बहुसंख्याने उपस्थित होते.