पंचायत समितीच्या अनागोंदी कारभार विरुद्ध धरणे आंदोलनाचा इशारा, #jantechaawaaz#news#portal#

46
प्रतिनिधी//
एटापल्ली;
             येथील पंचायत समिती प्रशासनातील अनागोंदी कारभार, पेट्रोल पंपवरील असुविधा व पेट्रोल, डिजल विक्री नफा रक्कमेतील भ्रष्टाचाराच्या चौकाशीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके व नागरिकांनी तहसीलदार पी व्ही चौधरी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
          पंचायत समिती प्रशासनात गेली एक ते दीड वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू असून नागरीकांना मिळणाऱ्या विविध शासकीय लाभाच्या योजना केवळ कागदावर पूर्ण झाल्याचे दाखवून विकास निधी हडप केल्याचा संशय निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे,  पंचायत समिती मार्फत विकास सर्व्हिस सेंटर या नावाने चालविले जाणारे पेट्रोल पंपवर ग्राहकांना कोणत्याही आवश्यक सोयीसुविधा न पुरवता पेट्रोल- डिजल विक्रीतुन झालेल्या नफा रक्कमेत घोळ करून भ्रष्टाचार केला गेल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे, 
             त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून कारवाही होण्यासाठी २७ जुलै गुरुवारी तहसील कार्यालय समोर, स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत  एक दिवसीय धरणे आंदोलन उभारले जाण्याचा इशारा संजय चरडुके नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक निजान पेंदाम, व्यंकटेश कंदीवार, 
रविंद्र रामगुंडेवार, निलेश गंपावार, तुलसीदास गुडमेलवार, श्रीनिवास कंबगौनीवार, नरोत्तम अधिकारी, रमेश ओडपल्लीवार, विशाल बाला, कृष्णा उप्पलवार, नूर शेख, सुजित बाला, अजय अधिकारी व नागरिकांनी निवेदनातू दिला आहे,