प्रतिनिधी//
अन्यथा शासन निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी
चामोर्शी: गट ग्रामपंचायत मुधोली तुकुम मध्ये मुधोली चक नं. हा गाव सामाविष्ट असुन या गावची आदिवासी लोकसंख्या ही 50% पेक्षा जास्त असुन मुधोनी चक नं. 1 च्या 100 पेक्षा जास्त लोकांची मिळून एक निवेदन सचिवकडे दि. 5/7/2023 ला या तारखेस गट ग्रामपंचायत मुधोली तु. प्रभारी सचिव यांच्याकडे देण्यात आला. या अर्जास सचिव व सरपंच कोणतेही दखल घेतली नाही.
सचिव व सरपंच यांनी गावात कोणतेही नीटीस व प्रतिउत्तर देण्यात आला नाही. ग्रामपंचायत मुधोली तु सचिव यांनी 13/7/2023 च्या नंतर आम्ही नोटीस लावू फक्त आश्वासन दिले. आणी कोणतेही ग्रामसभा घेण्यात आली नाही.
दिनांक 17/7/2023 गटविकास अधिकारी यांना ग्रामसभा घेण्यासाठी निवेदन देण्यात आले. मुधोली चक नं. गावातील आदिवासी विदयार्थी व लोकांचा खुप मोठा शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. गडचिरोली 80% हा पेसा अंतर्गत 17 संवर्गातील पद भरती शासनाचा निर्णय आहे. तरी पेसा पासुन आम्ही आदिवासी असुनही सुद्धा आरक्षणापासून वंचित आहोत. तरी आमच्या आदिवासी बांधवावर खुप मोठा अन्याय होत आहे. तरी गटविकास अधिकारी यांना विनंत करतो कि, मौजा मुधोली चक १ येथे सर्व ग्रामस्थान च्या स्वच्छेने ग्रामसभा भरवण्यात यावी.
जर सरपंचानी आपली कर्तव्ये पार दुराग्रहाने हेडसांड करीत आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ अंतर्गत सरपंचावर कार्यवाही करण्यात यावी. आवक जावक शाखा चामोर्शी द्वारा गट विकास अधिकारी प. समती चामोर्शी मा.सागर बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले,यावेळी उपस्थित मुधोली चक नं १ गावचे सर्व आदिवासी बांधव.