#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
एटापल्ली :नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या १३ अंगणवाडी मध्ये बालाजी बचत गट कडून ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी आहार शिजवून येत आहे परंतु आणलेला आहार हा एकही दिवस चांगला दर्जेदार मिळत नाही. आणि आहार शासनाने ठरवलेला मेनू नुसार मिळत नाही आहे, फक्त एकच प्रकारचे रोजरोज मिळत आहे तेही मुलांना अपुरे प्रमाणात मिळत आहे मुलांचे डब्बे रिकामे जात आहे आणि नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या १३ अंगणवाडीतिल काही अंगणवाडीत १ वाजता आहार पोहोचतो तोपर्यंत मुले वाट बघता बघता घरी निघून जातात हे वरील सर्व प्रकार सतत फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे. याची माहिती cdpo मॅडम आणि सुपेरवायसेर मॅडम ला सांगितल आहे अनेकदा आणि मुख्याधिकारी यांना सुद्धा अनेक पालकानी सांगितले परंतु नगरपंचायत ने याकडे दुर्लक्ष केले आहे. आचाल उकके सुपरवायजर मॅडम कडून हा दर्जाहीन अपुरे आहार स्तनिक पालक मनाई करतानाही घेण्यासाठी सक्ती करण्यात येत व पोलिस तक्रार व नोकरीतून काढण्याची धमकी देण्यात येत आहे अश्या विषयाचे निवेदन मा. तहसीलदार यांना आज भाकपा सचिव कॉ सचिन मोतकुरवार यांचा मार्गदर्शनात,अंगणवाडी कार्यकर्ती गुलशन शेख ,राजश्री खोब्रागडे ,छाया रामटेके , अनुसया झाडे , लता कोकूलवार , व इतर अंगणवाडी कार्यकर्ती यांनी दिले