संस्कारक्षम विध्यार्थी घडविणारी संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली प्रथम

186

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

एटापल्ली:शिक्षण आयुक्तालयाने परिपत्रक काढून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात श्री विजय संस्कार व सौ पूजा संस्कार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली परिसरातील उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली खाजगी व्यवस्थापनातील शाळा संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली ही तालुक्यात प्रथम आलेली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक, पालक व विध्यार्थ्यांना उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2023 अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत तालुका मूल्यांकन तथा जिल्हा मूल्यांकन समितीने भेट देऊन शाळेच्या उपक्रमांची तपासणी केली होती . तसेच उपस्थित शाळेच्या शिक्षक तथा विद्यार्थ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली होती. समितीने शाळेला भेट देऊन शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली व विध्यार्थ्यांशी हितगुज केली. प्रधानमंत्री शक्ती पोषण शक्ती निर्माण अंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली परसबाग , संस्कार शाळेने आर्थिक साक्षरता अंतर्गत शाळेने केलेल्या विविध प्रकारच्या दुकानातील व बँकेतील शैक्षणिक भेटी त्यानंतर शाळेतच तयार करण्यात आलेली संस्कार बँक , उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी प्राण्यांसाठी तयार केली प्राण्यांसाठी खाऊ च्या उपक्रमाची,मेरी माती मेरा देश , विद्यार्थ्यांचे उपस्थिती प्रमाण वाढविण्यासाठी शाळेने केलेले उपक्रम , विविध क्रीडा तथा विध्यार्थी विकासाच्या स्पर्धा , विविध राज्याची ओळख होण्यासाठी केलेले उपक्रम, विध्यार्थ्यानी केलेली शाळेतील प्रत्येक वर्गाची सजावट, बाल संसद /मंत्रिमंडळ, विध्यार्थ्यानी स्वतः तयार केलेली भित्तिचित्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे सामाजिक सहभाग , शाळा विकास, स्वच्छता मॉनिटर चे उद्द्येश व शाळेचा सहभाग इत्यादींचे निरीक्षण करण्यात आले. माझी शाळा सुंदर शाळा खेरीजही शाळा राबवित आलेल्या वृद्ध परिवारासाठी अक्षय आधार योजना , चिऊचा खाऊ , नि :शुल्क सुवर्णप्राशन, वोकल फॉर लोकल, माझी शाळा माझी जबाबदारी इत्यादी विविध उपक्रमांचे समितीने कौतुक केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून तालुक्यात खाजगी व्यवस्थापन असलेली प्रथम क्रमांक मिळविणारी ही पहिलीच शाळा आहे. शाळेने याआधीही श्री विजय संस्कार यांच्या संकल्पनेतून चालवलेली कोरोना काळातही भिंतीवरची शाळा व त्यानंतर उपस्थिती वाढविण्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी केलेले प्रयत्न यामुळे या आधीही संस्कार पब्लिक स्कूल प्रेरणादायी ठरलेली होती.