भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते अडपल्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन ६५ लाखांच्या निधीतून होणार डांबरी रस्त्याचे नूतनीकरण

113

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//
मुलचेरा:तालुक्यातील अडपल्ली-मलेझरी डांबरी रस्त्याचे नूतनीकरण होणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

अडपल्ली ते मलेझरी डांबरी रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे सदर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे येथील नागरिकांनी केली होती.रस्त्याची दयनीय अवस्था व नागरिकांची अडचण लक्षात घेता भाग्यश्री ताईंनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही रेटून धरली.अखेर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या कामासाठी तब्बल ६५ लाख रुपयांची निधी दिली.

त्यामुळे या डांबरी रस्त्याचे नूतनीकरण केले जाणार आहे.गावातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भाग्यश्री ताईंनी त्वरित निधी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी ताईंचे जंगी स्वागत करत शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या हस्ते या विकास कामाचे भूमिपूजन देखील करून घेतले.यावेळी येथील सरपंच रेखा कन्नाके,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युधिष्ठिर बिश्वास,माजी प स सभापती सुवर्णा येमुलवार, विवेकानंदपूरचे सरपंच भावना मिस्त्री,सुंदरनगरचे सरपंच जया मंडल, ग्रा प सदस्य कुंदोजवर,छत्रपती कुकुडकर,लक्ष्मण मडावी,परशुराम मोहूर्ले,धर्मपाल गोंगले, जनार्धन गुरनुले,रामचंद्र जन्पलवार,पांडुरंग वाढई, तुळशीराम भोयर,महादेव नेवारे,शांताराम भोयर,मोरेश्वर कावळे,विजय गुरनुले, वासुदेव कावळे,अर्चना गुरनुले,गंगाधर कुद्रपवार,लोमेश वनकर,राजकुमार गोंगले,सपना कावळे,सोनी मोहूर्ले,मनिषा गोंगले,रेखा उराडे,मनीषा मेश्राम,हितेन आत्राम,प्रमोद गुरनुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.