भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना निवेदन
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त अविकसित आकांशीत जिल्हा म्हणून ओळखला जातो.
त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी व आदिम जमाती चे लोक अति दुर्गम भागामध्ये असतात.त्या भागामध्ये गोदावरी, वैनगंगा , पैनगंगा अशा मोठ्या मोठ्या नद्या असल्या कारणामुळे त्यांना पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करून तिथं राहावं लागत आहे. त्याच प्रमाणे पूर परिस्थितीमध्ये त्यांचा खूप नुकसान पण होतो व त्यांना बेघर होऊन बाहेर राहावे लागते.
गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागामध्ये घर,रस्ते,रोडलाईन,नाली या संबंधित अनेक समस्या येत असतात. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलग्रस्त असून आदिवासी समाज ठक्कर बाबा समाज आदिम जमाती समाज यांना भौगोलिक सोयी सुविधा चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्तू सुधार 2225 D योजने अंतर्गत मोठ्या व आदिम जमाती विकास कार्यक्रम योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्या. अशी विनंती निवेदाद्वारा करण्यात आली.
मा.ना.आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सकारात्मक उत्तर देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या ठक्कर बाप्पा निधी आंतर्गत आदिवासी समाज व आदिम जमाती या समाजा च्या विकास कामा साठी लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असे आश्वासन दिले. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या विविध विकास कामाची सविस्तर चर्चा करण्यात आली.