प्रतिनिधी//
गडचिरोली:- आज दि.०७/०८/२०२३ रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीच्या वतीने शासकिय विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे जागतीक आदिवासी दिन व समाजाच्या विविध विषयावर आदिवासी विकास परिषद, गडचिरोली युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी शिवानी तलांडे, योगिता शेडमाके , संघटनेचे सचिव सुरज मडावी, जिल्हा संपर्कप्रमुख बादल मडावी, रुपेश सलामे,कैलाश गेडाम, मयुर कोडाप, आशिष कुमरे, भुषण मसराम, आदित्य येरमे, सुशांत दुगा, बंटी आलाम, धनंजय मरसकोल्हे, आशिष आत्राम, यांच्यासह इतर संघटनेचे कार्यकर्ते व शहरातील अनेक युवक युवती उपस्थित होते.
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच विविध आदिवासी संघटनाच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथील आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहात जागतीक आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता बुधवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०० वाजता कै. बाबुरावजी मडावी स्मारक चौकातून रॅली काढण्यात येणार आहे.
जागतीक आदिवासी दिवस आपल्या हक्काचा व अस्तित्वाचा दिवस असल्या कारणाने सर्व आदिवासी युवक – युवती व समाज बांधवांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.