#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती
*अहेरी:-* नजीकच्या आलापल्ली येथे 19 फेब्रुवारी सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिना निमित्य क्रीडा संकुलच्या भव्य मैदानावर प्रख्यात व सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे प्रस्तुत ‘शिंदेशाही बाणा’ अर्थात गायनांचा अनमोल नजराणा कार्यक्रमात शिव, भीम व लोकगीतांचे धमाल झाले
‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्या तनुश्री ताई आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महीला जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, लीलाधर भरडकर, पुष्पा ताई अलोणे, सुरेंद्र अलोणे, श्रीनिवास विरगोनवार , सारिका गडपल्लीवार आदी मान्यवर होते.
सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे दोनच राजे इथे गाजले…,नांदण, नांदण, रमाचं नांदन…’माझं नवीन पोपट हा, लागला मिटू मिटू बोलायला…’ या आणि भीम, शिव व लोकगीतांच्या बहारदार गाण्यांवर रसिक व प्रेक्षक जबरदस्त थिरकले , उल्लेखनीय म्हणजे गायक आनंद शिंदे यांनी बहारदार आवाजातून प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले व रिझविले. कार्यक्रमात तुडूंब गर्दी होती.
बॉक्स
*तिरकामठा व बांबूची टोपी भेट देऊन सत्कार!*
प्रख्यात व सुप्रसिद्ध महान गायक आनंद शिंदे हे पहिल्यांदाच अहेरी उपविभागातील आलापल्ली येथे आल्याने त्यांचे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी आदिवासी संस्कृती व परंपराची ओळख असलेले बांबूनी बनविलेले डोक्यावर टोपी चढवून तीर कामठा गायक आनंद शिंदे यांना भेट दिले आणि शाल श्रीफळनी भावपूर्ण सत्कार केले.