भगतनगर येथे वार्षिक मतूआ धर्म मिलन महोत्सव माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती

44

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती

मुलचेरा:-तालुक्यातील भगतनगर येथे वार्षिक मतूआ धर्म मिलन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले.

दरवर्षी याठिकाणी वार्षिक मतूआ धर्म मिलन महोत्सव साजरा केले जाते.याही वर्षी १९ फेब्रुवारी पासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून १९ फेब्रुवारी रोजी घटस्थापना व श्री श्री हरिचांद ठाकूर यांची प्रार्थना २० जानेवारी रोजी भोर आरती,नगर कीर्तन,गोष्टमान,हरिनाम कीर्तन,मतुआ संगीत,श्रीहरी संगीत व महा संकीर्तन गायन तसेच महाप्रसाद वितरण तर २१ तारखेला कवीगाण कार्यक्रम होणार आहे.यासाठी कमेटीतर्फे योग्य नियोजन करण्यात आले.

भाग्यश्री ताई आत्राम यांनी निमंत्रणाला मान देत २० फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी याठिकाणी भेट देऊन आशीर्वाद घेत महाप्रसादाचा आस्वाद घेतला.यावेळी कमिटी तर्फे ताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सरपंच जया मंडल, कमिटीचे अध्यक्ष तथा ग्रा प सदस्य डॉ निखिल इज्जतदार,उपाध्यक्ष विकास रॉय,सचिव गंगाधर मंडल, कोषाध्यक्ष सुजय रॉय,सह कोषाध्यक्ष परितोष मंडल तसेच गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.