#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
आलापल्ली परिसरातील मुलींचा प्रवास सुकर;मुलींच्या चेहऱ्यावर झळकला आनंद!
धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय,आलापल्ली येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळ,अहेरीचे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज व कोषाध्यक्ष कुमार अवधेशराव बाबा यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले.बाहेर गावचे विद्यार्थिनी ये-जा करण्याकरता अडचण निर्माण होते.त्याकरिता पाच किमी अंतर पायी जावे लागत होते त्यामुळे उपस्थितीवर परिणाम होत होते. मानव विकास मिशन अंतर्गत ५८ सायकलचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.!
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. कोडेलवार सर पर्यवेक्षक श्री.खोब्रागडे सर श्री. वैद्य सर,श्री. खनगन सर, श्री.मामीडपल्लीवार सर, श्री. खरवडे सर, श्री. राऊत सर किरंगे मॅडम ,बांबोडे मॅडम,टिपले मॅडम, झिलकलवार मॅडम, ताजने मॅडम, उपलवर मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते!