पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महारुशी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा पद्मशाली समाज मोठ्या संख्येने राजनगरी अहेरी येथे उपस्थित

176

पद्मशाली समाज मोठ्या संख्येने राजनगरी अहेरी येथे उपस्थित

*अहेरी:-* राजनगरीत दरवर्षी मोठ्या उत्साहात पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महारुशी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षी सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होऊन पद्मशाली समाज अहेरी राजनगरी एकत्रित रित्या एकवटला आणि पद्मशाली समाज मंदिर येथे मोठ्या उत्साहात आराध्य दैवत श्री मार्कंडेय महारुशी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी कलश यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण अहेरी राजनगरी दुमदुमून गेली होती. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू, सत्कार समारंभ हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्री.मारोतराव पडलवार, उपाध्यक्ष,श्री.वामनराव चीप्पावार,युवा अध्यक्ष श्री.श्रीकांतराव कवटलवार,युवा उपाध्यक्ष श्री.रविजी जोरिगलवार,महिला अध्यक्ष सौ.योगिताताई सामलवार,महिला उपाध्यक्ष सौ.सरोजिनी गुंडावार आणि समाज कार्यकारीतील सर्व सदस्य गण मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थितीत होते.
तसेच कार्यक्रमात महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मशाली समाज बांधवांनी मोलाची भूमिका बजावली.!