16 फेब्रुवारी 2024 रोजीच्या देशव्यापी ग्रामीण भारत बंद व औद्योगिक क्षेत्रीय संप

62

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

एटापल्ली: जाहीर समर्थन देण्यासाठी व गट्टा तालुक्याच्या मागणीसाठी दि.16 फेब्रुवारी 2024 ला गट्टा मार्केट बंद राहणार असल्याबाबत व गोटूल भवन गट्टा येथे चर्चासत्र व सभा आयोजन संयुक्त किसान मोर्चा तथा केंद्रीय ट्रेड युनियन
16 फेब्रुवारी 2024 रोजी संयुक्त किसान मोर्चा आणि केंद्रीय ट्रेड युनियन द्वारे देशव्यापी ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक क्षेत्रीय संप आयोजित केला जात आहे.
आम्ही या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन देतो आणि गट्टा तालुक्याच्या मागणीसाठीही आवाज उठवतो. या आंदोलनामुळे 16 फेब्रुवारी 2024 रोजी गट्टा मार्केट बंद राहणार आहे. व गोटूल भवन गट्टा येथे चर्चासत्र व सभा आयोजन
संयुक्त किसान मोर्चा तथा केंद्रीय ट्रेड युनियन खालील मागण्याही करत आहे:
1.गट्टा तालुका निर्मिती करा.
2.कामगारांसाठी न्यूनतम वेतन वाढ करा.
3. सुरजागड लोयडस मेटलसहित इतर प्रस्तावित नवीन खाणी रद्द करा.
4. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करा
4.धानाला 3100 रु MSP द्या .
5.महागाई नियंत्रित करा,बेरोजगारी दूर करा .
6.एमएसपीची हमी कायद्याने द्या: किसानांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत मिळेल याची खात्री करण्यासाठी एमएसपी (न्यूनतम आधारभूत किंमत) कायद्याने द्यावी अशी मागणी आहे.
7. शेतकार्यावरील कर्ज माफ करा: देशभरातील शेतकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज जमा झाले आहे. हे कर्ज माफ करा.
8. कामगार कर्मचारी विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा.
9. शासकीय,निमशासकीय विभागात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कायम करा.
10. एटापल्ली ते गट्टा रस्ता नवीन डांबरीकरण करा.
11. गट्टा जि.प क्षेत्रात धान साठवणूक करण्यासाठी नवीन मोठे गोडाउन बांधकाम करून द्या.
12. सर्वे करून पीकविमा ची भरपाई द्या.
13. गट्टा जि.प क्षेत्रात वीज जात येत असते यावर उपाययोजना करून वीज पुरवठा नियमित करा.
14.दमकोंवाही प्रस्तावित खदान रद्द करा.
15. गट्टा येथे पेट्रोल पंप व गॅस एजन्सी द्या.

सुरजागड पारंपरिक इलाका समिती सैनू गोटा
संयुक्त किसान मोर्चा तथा केंद्रीय ट्रेड युनियन
एटापल्ली
कॉ. सचिन मोतकुरवार ता.सचिव
कॉ.सुरज जककुलवार
कॉ.विशाल पुज्जलवार
लक्ष्मण नवडी इलाका सचिव
कॉ.छाया जेट्टी ग्रामपंचायत सदस्य पुरसलगोंदी
रमेश कवडो जी
इंडियन दस्तक्क तालुका प्रतिनिधी कॉ.तेजस गुज्जलवार
शीला गोटा जी व असंख्य नागरिक उपस्थित