अखेर संजय चरडुके व जनार्धन नल्लावार यांचा राकॉ मध्ये प्रवेश मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले स्वागत

308

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले स्वागत

एटापल्ली:गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चरडुके यांनी अनेक कार्यकर्त्यांसह राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य पटांगणात पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,माजी जि प सदस्य नाना नाकाडे,राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी प स सभापती बेबीताई नरोटे,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,राकॉचे कार्याध्यक्ष संभाजी हिचामी, नगरसेवक जितेंद्र टिकले, लक्ष्मण नरोटी,राजू नरोटी,अभि नागुलवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील अनेक दिवसांपासून संजय चरडुके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यावर असल्याची चर्चा होती.अखेर शुक्रवारी त्यांनी जाहीर प्रवेश करत या चर्चांना पूर्ण विराम दिला.त्यांच्या सोबत एटापल्लीचे माजी पंचायत समिती सभापती जनार्धन नल्लावार तसेच सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देत सर्वांचे स्वागत केले.

दरम्यान एटापल्ली तालुक्यात आगमन होताच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे ढोल,ताशांच्या गजरात,रेला नृत्य करत फटाक्यांचा आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी एटापल्ली तालुक्यातील विविध भागातून आलेले हजारो नागरिक उपस्थित होते.

*मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास-संजय चरडुके*

आदिवासी विध्यार्थी संघटनेत फूट पडली असून अंतर्गत वाद चवाट्यावर आला आहे.शिवाय दोन नेते दोन बाजूला गेले आहेत.आपल्या भागाचा विकास करायचा असेल विकासाचा दृष्टिकोन असलेल्या नेत्या सोबत राहणे आवश्यक आहे.मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा विकासासाठी धडपड सुरू आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असून त्यांच्या छत्रछायेत काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.