#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
अहेरी:-तालुका मुख्यालय पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महागाव खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
महागाव खुर्द येथील अंतर्गत रस्ते बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.त्या अनुषंगाने माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुढाकार घेऊन याठिकाणी सिमेंट रस्ता बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिली आहे.नुकतेच महागाव खुर्द येथे त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.सिमेंट रस्त्याचे बांधकाम होणार असल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने गावकऱ्यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम व माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.
दरम्यान विकास कामांच्या भूमिपूजन निमित्त गावात आगमन होताच गावकऱ्यांनी ताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी येथील सरपंच रेणुका आत्राम,पेसा अध्यक्ष तुकाराम नैताम,ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी आलाम,माजी सरपंच मधुकर आत्राम,किष्टय्या मेश्राम,गिरमा तलांडी, नागेश करमे,आदी मान्यवर उपस्थित होते.