अहेरी उपविभागात मोबाईल सेवा सुरळीत करा संदीप कोरेत *झिंगानुर आसरलली जारावडी कसनसुर परीसरात bsnl स्विच ऑफ*

68

अहेरी उपविभागात एटापल्ली तालुक्यातील जारावांडी कसनसुर सह सिरोंच तालुक्यातील झिंगाणुर आसरलली अहेरी तालुक्यातील दामरंचा देचलि पेठा व मलचेरा तसेच भामरागड तालुक्यातील बहुतांश अतिदुर्गम भागात मोबाईल सेवा सुरळीत करा अशी मागणी निवेदनाद्वारेआदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांनी खासदार अशोक नेते तसेच जिल्हा दूरसंचार अधिकारी गडचिरोली यांना करण्यात आले आहे
बीएसएनएल सेवा गेल्या 15ते 20दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून असलेली ब्रॉडबँड सेवा बंद असल्याने बँकेच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. मोबाईल सेवेसह दूरध्वनी सेवाही ठप्प झाल्याने उपविभागातीलसमस्या युक्त गावातील जनतेचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष देण्याची मागणी होत आह उपविभागातील ग्रामीण भागात हजारोच्या संख्येने बीएसएनएलचे दूरध्वनी ग्राहक आहेत बीएसएनएलच्या कनेक्टीव्हीटीअभावी मोबाईल धारकांना फोन सतत आऊट ऑफ रेंज असल्याचा अनुभव येत आहे रेंज मिळालीच तर क्रॉस कनेक्शन लागते व आवाजही स्पष्ट येट नाही त्यामुळे मोबाईल धारक हेरान झाले आहेत तसेच कार्यालयीन कामकाज ठप्प पडल्यामुळे जनतेच्या अत्यावश्यक गरजा प्रभावित झाल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याचे दाखले, ऑनलाईन अर्ज, शासकीय योजनांची माहिती, विद्यार्थी पोर्टलवरील माहिती भरणे या सर्व गोष्टींवर परिणाम झाला असून याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने जनतेत या विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांचे हालशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व विविध शासकीय दाखले ऑनलाईन मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकाना तालुका मुख्यालयी यावे लागत आहे. ग्रामीण भागात कनेक्टीव्हीटी अभावी कामे होत नसल्याने त्यांना दररोज तालुका मुख्यालयी चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना प्रवासाचा आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.
त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत असून 15ते 20दिवसांपासून सेवा बंद असूनही वरिष्ठ लक्ष देत नसल्याने जनतेने तक्रार कुठे करावी? असा प्रतिप्रश्न जनतेतून उपस्थीत होत आहे त्यामुळें वरिष्ठांनी विषयाचे गांभीर्य ओळखून स्वतःह लक्ष घालून मोबाईल सेवा सुरळीत करा अशी मागणी निवेदनाद्वारे आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांनी खासदार अशोक नेते तसेच जिल्हा दूरसंचार अधिकारि, भारत संचार निगम लिमिटेड गडचिरोली यांना केली आहे तेव्हां सोबत उपस्थीत विजय नल्लावारजिल्हा सचिव भाजपा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते