#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
एटापल्ली :संवर्ग विकास अधिकारी
पंचायत समिती भामरागड
शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस यांना इंधन बिल मिळत नसल्याबाबत चौकशी अहवाल सादर करण्याबाबत
आपल्याला हे निवेदन शालेय पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी आणि मदतनीस यांना इंधन बिल मिळत नसल्याबाबत लिहित आहे.
आपल्याला माहित आहेच की, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत, शासनाकडून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची तरतूद आहे. या योजनेमध्ये स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्याकडून अत्यंत महत्त्वाचे काम केले जाते. मात्र, अनेक वर्षांपासून इंधन बिल शासनाकडून येत असतानाही, भामरागड पंचायत समितीमधील स्वयंपाकी आणि मदतनीस यांना ते मिळत नाही. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस हे आहार बनविण्यासाठी सुखे लाकूड आणून त्यावर आहार शिजवतात परंतु त्या सुखे लाकूड कहा इंधन खर्च आजतागायत मिळलेल नाही, शासनाकडून इंधन बिल येत असताना ते शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस यांना मिळत नाही आहे याची आपण चौकशी करावी.
आम्ही आपणास विनंती करतो की या प्रकरणाची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करावा.
इंधन बिल मिळण्यास विलंब होत असल्याचे कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. भविष्यात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करावी.
आम्हाला विश्वास आहे की आपण या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती कारवाई कराल. धन्यवाद.
कॉ.सचिन मोतकुरवार आयटक जिल्हा संघटक गडचिरोली
1) कॉ.शरीफ शेख
2) कॉ.विशाल पुज्जलवार
3)कॉ. सुरज जककुलवार
४) कॉ. जयंत येमुलवार
5)कॉ.सुरेश मडावी






