अंगणवाडी केंद्रात निक्रुष्ट आहार पुरवठा. नगर पंचायत एटापल्लीवर विद्यार्थी व पालकांचा घेराव.

64

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी/

एटापल्ली: दिनांक १। २। २४पासुन नगर पंचायत एटापल्लीच्या क्षेत्रात मा. जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली ह्यांनी नगर पंचायत अंतर्गत एकुण १३अंगणवाड्या कार्यरत आहेत व अवघे ६दिवसच झालेले असतांना जो मुलांना बचत गट पुरवठा करीत आहे तो गट लहान मुलांना पोषण व पौष्टीक आहार देण्यात असमर्थ ठरला आहे. त्याचा प्रत्यय आज पहायला मिळाला.
पालकांनी मुलांना घेऊन थेट नगर पंचायत एटापल्ली येथे धडक देऊन उचित कार्यवाही व कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही मुलांना व मातांना अंगणवाडीत पाठविणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
ह्या प्रकरणात जवळपास २०मातापालकव३०लहान मुले धडकेत सहभागी झाले होते. व इतर मातापालक नगर पंचायत एटापल्ली च्या बाहेर कल्लोळ करून मुलांच्या आरोग्याप्रती हळहळ व चिंता व्यक्त करून मातापालक ३ते६वयोगटातील मुलांच्या आरोग्य व भविष्याप्रती भविष्य अधांतरी असल्याचे दिसून येत आहे.
ह्या बाबतीत मा. प्रशासन अधिकारी ह्यांना विचारले असता आलेल्या तक्रारी संबंधी महीला व बाल विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली (नागरी) ह्यांचेकडे प्रकरण सोपविण्यात येईल असे म्हटले.
एकंदरीत वातावरण दुषित झालेले आहे.