#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
दरवर्षी होणाऱ्या श्री प्रशिक्षण संस्था अहेरी द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेत अहेरी जिल्ह्यातील अहेरी, आल्लापल्ली, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मूलचेरा, आष्टी इत्यादी तालुक्यातील व बहुसंख्य गावातील शाळेचे विध्यार्थी सहभागी होत असतात. यावर्षी झालेल्या चित्रकला स्पर्धेत संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली ची इय्यत्ता 4 थी ची विद्यार्थिनी कु आराध्या तुषार पवार हिने प्राथमिक गटात तृतीय क्रमांक मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या संस्थेच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिल्ड, प्रमाणपत्र व बक्षीस रक्कम तिला देण्यात आले.याबद्दल संस्कार पब्लिक स्कूल चे डायरेक्टर श्री विजय संस्कार व पालक श्री तुषार पवार यांनी श्री प्रशिक्षिण संस्थेचे आभार मानले. वेगवेगळ्या क्षेत्रातील स्पर्धेत संस्कार पब्लिक स्कूल चे विध्यार्थी सहभागी होऊन नावलौकिक मिळवतात हे विशेष.