*ठिकठिकाणी वाजत-गाजत मोठ्या ऊत्साहाने स्वागत.
*सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी व आविस पक्षाला खिंडार,अनेक कार्यकर्ते,भाजपा पक्षात केले प्रवेश.
*युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता ह्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपात प्रवेश.
माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून सिरोंचा तालुक्यातील बर्याच गावातील शेकडो युवकांनी स्वयंस्फुर्तपणे अहेरीला येवुन राजे साहेबांची भेट घेतली व त्यांचे नेतृत्व स्विकारुन भाजपात प्रवेश घेतला.एवढेच नव्हे तर तालुक्यात दौरा करण्यासाठी आग्रह केला.सगळीकडे शेवटी भ्रमनिरासच झाले असुन सर्व गावातील जनतेला राजे साहेबांच्या भेटी ओढ असल्याचे सांगीतले.सर्व युवकांच्या विनंतीला मान देऊन राजे साहेबांनी दौरा आखला.दौर्यात
सिरोंचा,अमरावती,मेडाराम,कारसपल्ली,मर्रीगुडेम,नारायणपूर, तिगलगुडेम, नगरम,तुमनूर, रामंजापुर,मंडलापूर येथील राष्ट्रवादी व आविस पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.जागोजागी राजे अम्ब्रीशराव महाराजांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.प्रत्येक गावात मोठ्या सख्येंने नागरीकांनी भेटी घेतल्या,सिरोंचा तालुक्यातील 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कारसपल्ली,अमरावती,या गावात माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी भेट दिली आहे,
भेटीदरम्यान कारसपल्ली,अमरावती गावातील माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्यासमोर नागरिकांनी गावातील विविध समस्या मांडल्या
त्यावर राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी गावातील विद्युत पुरवठा,रस्ते इत्यादी समस्या सोडवु आणि धान खरेदीसाठी गोडाऊन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.







