पेरमिली पट्टीचा पारंपरिक गढी दसराची जागा वागळून, ३३KV विद्युत उपकेंद्राची बांधकाम करण्याचा निर्णय झाला.

64

आज दिनांक १९/०१/२०२४ रोजी, राजवाडा अहेरी येथे राज्याचे *अन्न व औषध प्रशासन मंत्री, ना. धर्मराव बाबा आत्राम साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली पेरमिली येथील ३३KV विद्युत उपकेंद्राची बांधकाम संदर्भात महत्त्वाचा बैठक घेण्यात आला.
सदर बैठकीत माजी जि.प.अध्यक्ष मा. भाग्यश्री ताई हलगेकर ( आत्राम ), मा. अप्पर जिल्हाधिकारी अहेरी, मा. उपवनसंरक्षक वन विभाग आलापल्ली, मा. तहसीलदार अहेरी, मा. अधीक्षक अभियंता विद्युत विभाग गडचिरोली, मा. कार्यकारी अभियंता विद्युत विभाग आलापल्ली, मा. तलाठी पेरमीली यांच्यासह पारंपारिक पेरमिली ईलाका पट्टीतील नागरिक यांच्यामध्ये *पेरमिली पट्टीचा गढी दसरा जागा आणि ३३ KV विद्युत उपकेंद्र* या विषयावर महत्त्वाचा चर्चा झालेला आहे.
या चर्चेमध्ये पेरमिली ईलाका पट्टीतील नागरिकांनी – *मंत्री, धर्मराव बाबा आत्राम साहेब* यांना विनंती केली की, आमचा पारंपारिक पेरमिली ईलाक गढी दसराची जागा वगळून, ३३ KV विद्युत उपकेंद्राचा बांधकाम करण्यात यावी आशी विनंती केलेला आहे. कारण आम्ही पेरमिली पट्टीतील सर्व नागरिक एकत्रित मिळुन अनेक वर्षापासून गढी पुजा आणि गढी दसराचा उत्साह पारंपारिक पद्धतीने साजरा करीत आहो. म्हणुन आम्हाला सदर कार्यक्रम घेण्यासाठी जागाची आवश्यकता आहे. असे विनंती करण्यात आले.
यावेळी वरील मंत्री महोदय, सर्व अधिकारी आणि पेरमिली पट्टीचे नागरिक यांचे चर्चेनंतर असे ठरविण्यात आले आहे की, *पारंपरिक गढी दसराचा जागा वगळून, पेरमिली येथील शासकीय आरोग्य केंद्राचा समोरील जागा ३३KV विद्युत उपकेंद्राची बांधकाम करण्यासाठी वन विभागाने जागा देण्यास तयार झालेला आहे.*
*म्हणुन आता पारंपारिक गढी दसरा साठी सुध्दा जागा मिळाला आणि ३३ KV विद्युत उपकेंद्राची बांधकाम करण्यासाठी सुध्दा जागा मिळाला आहे.* या चर्चेमधे दोनही कामांना महत्त्व देण्यात आले आहे.
यावेळी पारंपारिक पेरमीली ईलाका पट्टीतील शेंडीयासह सर्व ५० गावचे भुमिया, गायता आणि पट्टीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.