अगनवाडी सेविकांचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे साकडे.
*राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पाठींबा देत, शक्तीनिशी पाठपुरावा करण्याचा दिला आश्वासन!
अतिशय तटपुंज्या मानधनावर राज्यातील अंगनवाडी सेवीका आणि मदतनीस काम करत आहेत.गत ४० वर्षांपासुन योग्य मोबदल्यासाठी अंगनवाडी सेविकांचा लढा सुरु आहे.यावेळेस पुन्हा राज्यभर संप पुकारण्यात आला आहे.मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु असुन सर्व प्रमुख नेत्यांना निवेदने देऊन त्यांच्या मागण्यांना समर्थन वाढविण्याचा प्रयत्न संघटनांमार्फत सुरु आहे.
शेकडो अंगनवाडी सेविकांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची भेट घेतली व राजे साहेबांच्या कार्यक्षमतेवर पुर्ण विश्वास असुन त्यांनी मागण्या मंजुर होण्यासाठी जोर लावावा अशी विनंती केली व आयटक संघटनेमार्फत सर्वोच्च्य न्यायालयाच्या ग्रज्युईटी देण्याबाबतच्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी.शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागु करावी अथवा मानधनात मोठी वाढ करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन राजे साहेबांना सादर केले त्यावर राजे साहेबांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला व शासणाकडे पुर्ण शक्तीनिशी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.!