सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा दणका अखेर 353c राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात

118

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा दणका

अखेर 353c राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात

सिरोंचा;- आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353c अखेर या मार्गाचे कामाला सुरुवात झाली असून या मार्गासाठी एक मेव सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटिकोंडावार यांनी लढा दिला होता अखेर त्यांच्या प्रयत्नात यश आले असून आता प्रवास सुखमय होणार आहे

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353c या मार्गाची दयनीय अवस्था झाली होती कित्येक अपघात या मार्गवर झाले होते या मार्गावर प्रवास करणे अवघड झाले होते शाळकरी मुलांपासून तर गरोदर मतांपर्यंत या लोकांना वेदना सहन करावा लागत होते

ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी रेपणपल्ली येथे चक्का जाम आंदोलन केले होते तबल आंदोलन हे पाच तास चालले या आंदोलनात आलापल्ली सिरोंचा मार्गावर यातायात ठप्प झाली होती

पोलीस प्रशासनाला मध्यस्ती करावी लागली संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व अखेर काही दिवसात या कामाला सुरुवात झाली

लोकांच्या समस्यांसाठी नेहमीच झटणाने सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे व नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे