अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेची मुख्यमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी.
गडचिरोली – अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीच्या वतिने नुकताच गोसीखुर्द प्रशासनाने गोसीखुर्द धरण ओव्हर फ्लो झाले असल्यामुळे त्या पाण्याचे विसर्ग करण्याकरिता गोसीखुर्द धरणाचे दरवाजे दि. १५ व १६ सप्टेंबर ला उघडण्यात आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याची जिवनदायी वैनगंगा नदिला पूर आला. या पूरामुळे जिल्ह्यातील वाहतूक पूर्णता विस्कळीत झाली
होती. त्याच बरोबर गडचिरोली-नागपूर, चामोर्शी, आष्टी आदि मार्ग बंद झाले होते. त्यासोबतच या पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हातात आलेल्या पिकांची उदा. धान,कापुस, सोयाबीन आदि पिकांची अतोनात नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांन मध्ये हताशाचे वातावरण निर्माण झाले आहे. महोदय आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना चे पदाधिकारी आपणास विनंती करतो कि जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ सर्वे करुण त्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन मदत करावी या मागणी चे निवेदन मा. मुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे यांना मा. जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत देण्यात आले.
यावेळेस निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, उमेश उईके, बादल मडावी, रुपेश सलामे, भुषण मसराम, कैलाश गेडाम, अक्षय वाढई आदि पदाधिकारी उपस्थित होते.