प्रतिनिधी//
अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रायगट्टा या गावातील नागरिकांनी गावाच्या विकास करण्याकरिता विविध कामे तातडीने करण्याबाबतचे निवेदन खांदला ग्रामपंचायतीचे सरपंच सुमन आलाम यांना दिली. रायगट्टा गावात अद्याप रस्ते, नाल्या व इतर पायाभुत सुविधेची कामे झालेली नाहीत.
गावातल्या पायाभुत विकासाची कामे करण्याची प्राथमिक व मुख्य जबाबदारी ग्रामपंचायतीची असून देखील रायगट्टा गावात एकही काम झालेले नाही. त्यामुळे पहिल्यांदाच गावातील नागरिकांनी एकोप्याने विकास कामांसाठी निवेदन दिले आहे. त्यात गावातील अंतर्गत मुख्य रस्त्यांचे सी.सी. रोड बांधकाम करणे, नाल्यांची बांधकामे करणे, गावातील विद्युत खांबावर एलइडी बल्ब लावणे,
सार्वजनिक व खाजगी विहिरींत ब्लिचिंग पावडर टाकणे, सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम करणे, शेताकडे जाणा-या पांदण रस्त्यांचे बांधकाम करणे, पात्र लाभार्थ्यांना घरकुल व वैयक्तिक शौचालय मंजुर करणे, गावात सार्वजनिक शौचालय बांधणे, गावातल्या युवकांसाठी क्रिडांगण उपलब्ध करुन देणे,
ढोरफोडीची जागा निश्चित करुन देणे, जिल्हा परिषद शाळेला डिजिटल साहित्यांचा पुरवठा करणे, नियमित गावात फवारणीची व्यवस्था करणे व बेरोजगार युवकांसाठी कौशल प्रशिक्षणाची सोय करुन देण्यात यावी, अशा स्वरुपाच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. सदर निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, गट विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी व ग्रामसेविका ग्रामपंचायत खान्दला यांना देखील पाठविण्यात आली आहे.
निवेदन देताना रायगट्टा गावातील नागरिक सुचिता भंडारवार, कविता कोलावार, सौन्दर्या कोलावार, राजन्ना निलमवार, सत्यनारायन येतमवार, श्याममुर्ती मारशेट्टीवार, नागेश चिंतावार, श्रीनीवास अग्गुवार, नारायण चिटकाला, हनमंतु येतमवार, चन्द्रराव अल्लमवार, स्वामी पत्तीवार, रमेश जाकेवार, शंकर कोलावार, राजेश कर्णेवार, तिरुपती ओडनालवार, श्रीनीवास ओडनालवार, रविंद्र भंडारवार, तुकाराम आलाम व इतर नागरिक उपस्थित होते.