त्या इसमाचे मृतदेह संशयास्पद आत्महत्या कि,हत्या #jantechaawaaz#news#portal#

78
प्रतिनिधी//

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,शाखा मुलचेरा यांची चौकशी करण्याची मागणी

मुलचेरा :-  अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या वतीने तालुक्यातील मौजा मौहुर्ली येथे मिळालेल्या मृत इसमाची आत्महत्या की, हत्या या बाबत अधिक चौकशी करुन कठोर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस निरीक्षक साहेब,पोलीस स्टेशन, मुलचेरा यांना निवेदन देण्यात आले.

















सदर घटना मौजा मौहुर्ली या गावात बिएसएनएल टॉवर जवळ एका खड्ड्यात मृतदेह हे दिनांक १८/०९/२०२३ सोमवारला  आढळून आले .














सदर इसमाचे नाव रामलु लचमा आलाम वय ४०वर्ष मु. मौहुर्ली पो.खुदीरामपल्ली ता. मुलचेरा असे आहे.या घटनेने  संपूर्ण गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.



















हि घटना आत्महत्या नसुन हत्या करण्यात आले असे संशय गावातील नागरिक करीत असुन सदर घटनेची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा व गावातील नागरिकांनी मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन, मुलचेरा यांच्याकडे केली आहे.


















यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद तालुका अध्यक्ष सतिश नगरसेविका सुनिता कुसनाके सचिव उमाकांत आत्राम, ग्रामसभा अध्यक्ष दिवाकर गावडे, मुन्नाजी नैताम, रविंद्र वनकर, वासुदेव मडावी, किर्तिमराम आलाम, वासुदेव ची. मडावी, गिरीदास आलाम, दिलिप आलाम, अनिल मेकलावार, ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर मरापे, चंद्रशेखर आत्राम, तालुका संघटक महेंद्र आत्राम, तालुका उपाध्यक्ष संदिप तोरे, चंद्रशेखर नैताम, संतोष आलाम, सचिन सिडाम, सुनंदा सिडाम, ग्रामपंचायत सदस्य दिक्षा नैताम, कल्पना दुर्गे, सुमन मारकवार, सुनिता मडावी, छाया आलाम, माया दुर्गे उपस्थित होते .