चितरंजनपूर (येनापूर) ता. चामोर्शी जि गडचिरोली येथे एका विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर तिन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. २७ नोव्हेंबर ला दुपारी 1 वाजताचे दरम्यान घडली
मृतकामध्ये रामेश्वर गंगाधर कुंभमवार वय 41 रा. अनखोडा व रियांशा धनराज वाढई वय ८ वर्षे रा. जामगीरी असे असुन रामेश्वर हा आपल्या दुचाकी क्र.एम.एच.३४ ए डब्ल्यू. ५९२४ ने त्यांचे सोबती प्रकाश निलकंठ नागुलवार वय ३२ रा अनखोडा कडून चामोर्शी कडे जात होते अचानक समोरुन येणारे धनराज वाढइ रा. जामगीरी दुचाकी क्र.एम.एच.३३ डी. ९८७२ ने येनापूर कडे जात असताना दोन्ही विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार पाचही जण रोडवर खाली कोसळले तेव्हा गडचिरोली कडून येणाऱ्या एम एच ३४ बी. झेड २३७७ या ट्रकच्या मागच्या भागात रामेश्वर आल्याने ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरुन गेले तेव्हा ते जागीच गतप्राण झाले तर रियांशा हिला जब्बर मार लागला व तिचाही जीव गेला तर निलकंठ नागुलवार, धनराज वाढइ, व एक महिला गंभीर जखमी झाले लागलीच स्थानिक लोकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र येनापूर येथे उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे
सदर घटनेची माहिती आष्टी पोलीसांना मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन गावडे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले
घटनास्थळाचा पंचनामा करून रामेश्वरचा मृतदेह आष्टी येतील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले व रियांश चा मृतदेह चामोर्शी येथे नेण्यात आला आहे मृतक रामेश्वर गंगाधर कुंभमवार हे अहेरी येथील रुग्णालयातील १०८ या अॅम्ब्युलन्सचे चालक होते त्यांना दोन मुली पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे
दोन दिवसांत दोघांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे अनखोडा गाव शोकसागरात बुडाला आहे
सदर अपघाताचा गुन्हा आष्टी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ट्रक व चालक यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलीस करीत आहेत.
कोड
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्पांमध्ये स्वतंत्र कॉरिडोर करण्यात याव्हे किंवा स्वतंत्र पाईपलाईन करून मालवाहतूक करण्यात यावे असे असताना सुद्धा ट्रका द्वारे कच्च्या मालाचे वाहतूक केली जात आहे आणि या ट्रकांच्या माध्यमातून रोज अपघात होत आहेत तसेच
अपघाताचे सत्र सुरूच आहेत आणि या अपघातामध्ये रोज एक दोन मृत्यू पावल्याचे दिसून येत आहे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच प्रत्येकी कुटुंबातील एका व्यक्तीस सुरजागड किंवा कोनसरी येते नोकरी देण्यात यावी अशी मागणी संतोष
ताटीकोंडावार जिल्हाध्यक्ष जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोली यांनी केली आहे