राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज.

176

 

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा या ठिकाणी 23 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची अन् मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट;होण्याची शक्यता आहे.तर 24,25,26 आणि 27 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात देखील 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

26 आणि 27 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो. दरम्यान, मराठवाड्यात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.तसंच विदर्भात 24 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून 25 ते 27 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झालीय.त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने हवामानात बदल झालाय. हवामानातील बदलामुळे २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान कोकण किनारपट्टीवर आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने पुण्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. सकाळी धुके आणि दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.!