प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळा पुणे येतील हॉटेल जे डब्लू मेरीएट येते संपन्न ,इंडियन दस्तक न्यूज चैनल मुख्य संपादक सुरेश मोतकुरवार यांना सम्मान चिन्ह व सत्कार

214

प्रतिनिधी//

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई आयोजित पत्रकारांच्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकापर्ण सोहळा आणि पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ रविवारी दि. २५ मे रोजी पुणे येथील जे डब्ल्यू मेरिएट या पंचतारांकित हॉटेल येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, एपीपी माझाच्या संपादिका सरिता कोशिक, मंत्रालय पत्रकार संघटनेचे दिलीप सपाटे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या उपस्थितीत पार पडला.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राज माने यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभीच प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापनेमागील उद्देश सांगितला. प्रतिबिंब प्रतिष्ठान हे गरजू पत्रकारांच्या मुला-मुलींच्या भवितव्यासाठी काम करणारे असून, या माध्यमातून पत्रकारांच्या मुला-मुलींसाठी प्रामाणिकपणे काम करेल. राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिशा मिळण्यासाठी डिजिटल मीडिया पोलिसी जाहीर झाली पाहिजे, अशी मागणीही राज माने यांनी केली. हा कार्यक्रम एखादा मोठ्या हॉटेलमध्ये कशाला, असे मला मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले होते, याची आठवण सांगत राज माने यांनी दादा, आम्ही माणसे साठी आहोत, परंतु काम टॉपचं करतो,या वेढी कार्यक्रमला उपस्थित विदर्भ समवायक सतीश आकुलवार, गडचिरोली जिला अध्यक्ष बाबू कुरेशी, गडचिरोली जिल्हा सचिव सुरेश मोतकुरवार व एटापल्ली तालुका अध्यक्ष तेजस गुज्जलवार यांना डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार सम्मान चिन्ह देऊन यांचा सत्कार ग्राम विकास / पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे याचा हस्ते करण्यात आला,