आदिवासी विकास युवा परिषदेचे नप मुख्याधिकारी गडचिरोली यांना निवेदन
गडचिरोली – आदिवासी विकास युवा परिषद व आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने उपमुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली यांना मुल रोडवरील न्यायालया जवळील विर कुमराम भीम असे नामकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. आदिवासीच जल जंगल जमीन वाचविण्यासाठी इंग्रज व निजामशाही विरोधात आवाज उठविणारे कुमराम भीम याच्या कार्याचा सर्व समाजाला माहिती व्हावी यासाठी सदर चौकास कुमराम भीम असे नामकरण करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, आदिवासी एकता युवा समिती चे अध्यक्ष उमेश उईके, आ.विकास युवा परिषदेचे जि.संपर्क प्रमुख बादल मडावी, जिल्हा मिडीयाप्रमुख रुपेश सलामे, युवा कार्यकर्ते भुषण मसराम आदि उपस्थित होते.