अहेरी:दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील प्रस्तावित बुद्ध विहाराचा जागेला भेट देत तथागत गौतम बुद्ध तथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले, ह्यावेळी बौद्ध समाज अहेरीचा वतीने शाल व श्रीफळ देऊन राजेंचा सत्कार करण्यात आले, ह्यावेळी बौद्ध समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.