शासकीय विश्राम गृह एटापल्ली येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न

79

 

एटापल्ली:-
महाराष्ट्र राज्यामध्ये बेकायदेशीररित्या स्थापन झालेलं हे सरकार मजूर, शेतकरी, बेरोजगारांच्या हिताचे नसून फक्त बोल घेवडे सरकार आहे. मोठ-मोठ्या योजना काढायच्या आणि महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करायची आणि पक्ष फोडाफोडी चा राजकारण करायचं असं काम हे जुमले बाज सरकार करत आहे. या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी तसेच संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्परी प्रयत्न करीत आहे. आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह एटापल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुका आणि (सदस्य व थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका तसेच पोट निवडणूक एकत्र लढवणार अशी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी रमेशजी गंपावार काँग्रेस तालुकाध्यक्ष, मनीष दुर्गे शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाप्रमुख, सचिन मोतकुरवार भाकपा तालुका सचिव, अक्षय पुंगाटी युवासेना तालुका अधिकारी, लोकेश गावडे काँग्रेस कार्यकर्ता, निजान पेंदाम नगरसेवक काँग्रेस, नामदेव हीचामी नगरसेवक शिवसेना (उ.बा.ठा.), किशोर कांदाे शिवसेना विभाग प्रमुख, सतीश मुप्पलवार काँग्रेस, श्रीकांत तेलकुंटलवार, महादेव हिरा, दानू आत्राम, सुरज जकुलवार, सुनील वरसे आदी सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.