लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा

79

 

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवसानिमित्त पुरसलगोंदी व पेठा येथे रेला नृत्याचे आयोजन

*पुरसलगोंदी/पेठा (१५ऑक्टो)*: लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे मौजा पेठा व पुरसलगोंदी येथे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा करण्यात आला.
या दिवसानिमित्ताने स्थानिक आदिवासी पारंपारिक नृत्याचे आयोजन केले गेले ज्याला “रेला” असे म्हणतात. रेला डान्समध्ये जवळपासच्या गावाच्या महिलांनी सहभाग घेतला, रेला नृत्य करणा-या महिलांना घरगुती वापरात येणारी वस्तु भेट देण्यात आली. मौजा पुरसलगोंदी येथे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या श्रीमती अरुणा सडमेक (सरपंच ग्रामपंचायत पुरसलगोंदी), आणि 4 गावातील ग्रामीण महिला,
गावातील गावकरी तसेच लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाणचे अधिकारी उपस्थित होते तसेच, मौजा पेठा येथे प्रमुख पाहुण्या मा.वनिता कोरामी (सरपंचा ग्रामपंचायत तोडसा), मा.श्री.दस्सा कोरामी पोलीस पाटील पेठा, मा.श्री.रैनु रापंजी पोलीस पाटील कारमपल्ली, श्री.राजु गावडे प्रतिष्ठीत नागरिक कारमपल्ली आणि २ गावातील ग्रामीण महिला, गावातील गावकरी तसेच लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाणचे अधिकारी उपस्थित होते
15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा केला जातो, हा दिवस ग्रामीण भागात कृषी विकास वाढवण्यात, हवामानातील लवचिकता निर्माण करण्यासाठी, कुपोषण आणि अन्न असुरक्षिततेचा सामना करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला आणि मुलांकरिता साजरा केला जातो.
ग्रामीण महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयांपासून अनेकदा वगळण्यात आले असूनही, ग्रामीण स्त्रिया त्यांच्या घरात आणि घराबाहेर ते विस्तृत कार्ये हाती घेतात. ते नैसर्गिक संसाधने व्यवस्थापित करतात, हवामान-लवचिक कृषी पध्दतींचा अवलंब करतात, जैवविविधता आणि कृषी उत्पादकता जतन करतात. या दिवसाची स्थापना ग्रामीण महिलांच्या त्यांच्या समुदायात आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण योगदानाची कबुली देण्यासाठी आणि कृषी, अन्न उत्पादन आणि ग्रामीण विकासामध्ये ग्रामीण महिलांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका साजरी करण्यासाठी करण्यात आली.