अभाविप नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

53
  • •अहेरी, १२ ऑक्टोबर
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे अहेरी जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या सदस्यता नोंदणी अभियानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नोंदणी करून घेतली. आलापल्ली येथील स्व. लक्ष्मीबाई महाविद्यालय, राजे धर्मराव कनिष्ठ तथा वरिष्ठ विद्यालय, राजे धर्मराव कला आणि वाणिज्य महाविद्यालय, (जनजाती)औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आणि अहेरी येथील एकलव्य निवासी शाळा, राजे धर्मराव कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालय, मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूल, शंकरराव बेजलवार कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालय, चाणक्य अकॅडमी आणि आष्टी येथील श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय अशा सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये हे सदस्यता उत्साहात पार पडले. अभियानाला अभाविप विदर्भ प्रांत मंत्री शक्ती प्रकाश केराम, अहेरी जिल्हा संयोजक रोहित अविनाश श्रीरामवार आणि आलापल्ली नगर मंत्री तसेच प्रांत कार्यकारणी सदस्य रोहित मुक्कावर यांच्यासह इतर विद्यार्थी मित्र उपस्थित होते…