विष्णु श्रीराम मोरे प्रतीनीधी किसनलाल गेहीराम अॅण्ड कंपनी यवतमाळ यांचे कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच. 32 बी. 9005 मध्ये फुड कार्पोरेशन इंडिया एफ. सी. आय. गोडावून वर्धा येथुन सिंदि रेल्वे साठी 400 बॅग तांदुळ भरला ट्रक चालक रत्नपाल लामसोंगे यांनी ट्रक मधील 48 बॅग तांदुळ एकुण 24 क्वींटल जु.कि. 61,200 /- रू. चा मुद्देमाल सिदार्थ नगर वर्धा रोडवरून दिनांक 05/10/2022 ते 06/10/2022 चे रात्र दरम्यान चोरी गेल्याचे कंपनीचे प्रतीनिधी विष्णु मोरे यांना माहीती दिल्याने त्यांनी घटनास्थळ गाठत खात्री करून वरील प्रमाणे 48 बॅग तांदुळ जु.कि. 61,200 /- रू. चा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार नोंद केल्याने पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.
पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार प्राप्त होताच गुन्हे शोध पथकाचे पो. हवा. संजय पंचभाई यांनी तपासाची चक्रे फिरवित गुप्त बातमीदार यांचे कडुन प्राप्त झालेल्या माहीती वरून 1. शेख समीर शेख शकिल 2. विशाल देवानंद मुरकुटे 3. शेख जमीर शेख शकिल सर्व रा. सिदार्थ नगर वर्धा यांना चोरीस गेलेल्या 48 बॅग तांदुळ एकुण 24 क्वींटल किंमत 61,200 /- रू. चा माल आरोपीतांकडुन जप्त करून अल्पावधीतच गुन्हा उघडकिस आणला अधिक तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. प्रशांत होळकर सा. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकि सा. उप विभागीय पोलीस अधीकारी पियुश जगताप साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशानुसार पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संजय पंचभाई, सुनिल मेंढे, शाम सलामे यांनी केली.