*माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न*

44

*अहेरी* :तालुक्यातील खांदला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा येथील बौध्द समाज बांधवांकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात पार पडली.     खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने ध्वजारोहण चा कार्यक्रम आयोजीत केला होता.
           या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम,माजी सरपंच ज्योतीताई जुमनाके,माजी सरपंच शकुंतला ताई कुळमेथे,माजी सरपंच विजय कुसनाके,माधव कुळमेथे,व्यंकटेश अलोने, माजी ग्रा.प.सदस्या वंदनाताई अलोने,बतूलवारताई,रमेश पोरतेट, व्यंकना कडारलावार, रामशंकर अंबलीपवार आदि मान्यवर उपस्थित होते.

                यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ध्वजारोहण माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
       ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माजी आमदार आत्राम यांनी धम्मचक प्रवर्तन दिनानिमित्य राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पटलावर  अनेक बाबींवर उपस्थितांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.यावेळी माजी आमदार आत्राम यांनी बाबसाहेबांबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

          खांदला येथे बौद्ध समाज बांधवांकडून खेळीमय वातावरणात धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला.