बोरी / लगाम पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या बोरी येथे माळी समाजभवनाचे लोकार्पण जि.प.च्या माजी अध्यक्ष व था गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते पार पडला.
पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या बोरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून माळी समाजातील समाजबांधवांना समाजभवन उपलब्ध नसल्याने समाजबांधव विविध सामाजिक कार्यक्रम ग्रामपंचायत परिसर व मोहल्यातील मुख्य चौक किंवा समाजातील एखाद्या व्यक्तीच्या घरच्या आवारात साजरा करीत होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याकडे समाजबांधवांनी समाजभवनाची मागणी केली असता, त्यांनी समाजभवनाकरिता
२५ / १५ इतर ग्राम विकास योजनेअंतर्गत ७ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. नवीन माळी समाजभवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून या ठिकाणी सुसज्ज इमारत उभी झाली आहे. यावेळी उद्घाटक म्हणून जि.प.च्या माजी अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम तर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून बोरी ग्रामपंचायतचे सरपंच शंकर कोडापे, पोलीस पाटील सत्यवान मोहुर्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नागेश करमे, महेश बाकीवार, साईनाथ अलवलवार, साईबाबा मडावी, बाबुराव पुल्लीवार, काशीनाथ मोहुर्ले, कविराज मोहुर्ले, पुंडलिक आदे, विजय कुकूडकर, राजू गुंडावार, रामा बद्दीवार आदी उपस्थित होते.