गुड्डीगुडम येथील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य भेट

54

टायगर ग्रुप चे पूढाकार
 अहेरी :तालुक्यातील गुड्डीगूडम येथील अनाथ मुलांना टायगर ग्रुप गुड्डीगूडम शाखेच्या  वतीने दिवाळी भेट म्हणून शैक्षणिक साहित्य भेटवस्तू देण्यात आले.
  टायगर ग्रुप आलापली चे पदाधिकारी दौलत रामटेके,साई तुलसीगीर,श्रीकांत जिल्लेवार यांच्या पुढाकाराने टायगर ग्रुप गुड्डीगूडम चे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आई वडील नसलेल्या अनाथ  नागराज पेद्दी व सुशांत पेद्दी असे दोन विधार्थी याचे कुटुंबाचे आर्थिक समस्या चे अडचण लक्षात घेऊन या दोन विध्यार्थ्यांना शालेय बॅग, नोटबुक, पेन, पेंशील, कंपास, कपडे, विविध प्रकारचे खाऊ असे दिवाळी भेट म्हणून भेटवस्तू देण्यात आले. या प्रसंगी सरपंच सरोजा पेंदाम, सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम टायगर ग्रुप गुड्डीगुडम चे अध्यक्ष तुषार बोगामी, सदस्य रुपेश पेंदाम,श्रीकांत सडमेक, प्रफुल पेंदाम, प्रशांत सडमेक, कोमल बोगामी, विश्व हिंदू परिषद चे जिल्हा कार्यकर्ते राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, आर्यन चिंतलवार आदी सदस्य आणि कुटुंबातील सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.