देशभरात जनआंदोलन बनलेली भारत जोडो यात्रा आता लवकरच आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार*

41

अहेरी :देशभरात जनआंदोलन बनलेली भारत जोडो यात्रा आता लवकरच  आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे लगबग वाढली असून प्रत्येक लहानसहान गोष्टींची पूर्तता करण्याचे नियोजन सुरू आहे. याच अनुषंगाने हिंगोली ते वाशीम दरम्यानच्या पदयात्रा मार्गावर निवास व्यवस्थाची  नियोजित जागेची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी  साहेब यांनी पाहणी केली. यावेळी काही महत्त्वाच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.  यावेळी आमदार अमितदादा झनक, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव सरनाईक, प्रदेश सदस्य हसनभाई गिलानी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वाशीम चक्रधर गोटे, वासीम जिल्हा प्रभारी गावंडे ताई, यवतमाळ जीवन पाटील, सुरेश हजारे, विठ्ठल पाटील गोटे, अनिल गोटे, सरकार इंगोले, संतोष इंगळे  आदी बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.