रामनगर गडचिरोली येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्यां पुण्यतिथी महोत्सवाचा आमदार डॉ देवरावजी होळी

43

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ग्रामविकासाची संकल्पना पूर्ण करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

गडचिरोल्ली: रामनगर गडचिरोली येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्यां पुण्यतिथी महोत्सवाचा आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या अध्यक्षेखाली समारोप*

वंदनीय राष्ट्रसंतांचे कार्य गावागावात मोठ्या संख्येने पोहोचण्याची आवश्यकता

दिनांक २० नोव्हेंबर २०२२ गडचिरोली

*भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ग्रामविकासाच्या स्वप्नांतून गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्य करीत असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेल्या ग्राम गीतेतील  गावविकासाच्या  आराखड्यातून आपल्या गावांचा विकास साधावा असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी रामनगर गडचिरोली येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी  महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात केले.

यावेळी सत्कार मूर्ती मा. डॉक्टर शिवनाथजी कुंभारे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, गुरुदेव सेवा मंडळाचे पंडितजी पूडके सर, ग्रामसेवाधिकारी सुरेशजी मांडवगडे उपग्रामसेवाधिकारी , मधुकरजी भोयर,  समन्वयक प्रमूख श्री रमेशजी भूरसे, सचिव श्री कवडुजी येरमे, सहसचिव रामकृष्णजी ताजने , कोषाध्यक्ष चंद्रभानजी गेडाम प्रचारक  नानाजी वाढई, माजी नगरसेवक श्री सतीशजी विधाते , चामोर्शी भाजपा तालुका अध्यक्ष  दिलीपजी चलाख, श्री हेमंत बोरकुटे, सौ. कविताताई उरकुडे,  माजी नगरसेविका सौ अनिताताई विश्रोजवार, माजी नगरसेविका सौ.  वर्षाताई शेडमाके, यांचेसह गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आपल्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की ,माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वांनी विकासाचे ग्राम असे स्वप्न बघितले असून त्यांनी सतत आपल्या भाषणांमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव  केला आहे. ग्रामगीतेच्या संकल्पनेतील गाव विकासाचा आराखडा तयार करून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित गुरुदेव भक्तांना केले तसेच वंदनीय राष्ट्रसंत यांचे कार्य गावोगावी घरोघरी पोहोचविण्याची आवश्यकता असून त्यांच्या विचारांची ही आज गरज असल्याचे याप्रसंगी ते म्हणाले.