राजाराम पोलिसांनी केली श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती

58

उप पोलीस स्टेशन राजाराम येथील पोलीस जवानामार्फत गोलाकर्जी ते गुड्डीगुडम पर्यंत रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती
राजाराम :अहेरी उपविभागांअंतर्गत येणाऱ्या गोलाकर्जी ते गुड्डीगुडम रस्त्याची दुर्दशा लपेना सदर रस्त्यावरती मोठं मोठे खडे पडून बिकट परिस्तिथी झाली कित्येक दा या मार्गावर अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावे लागले शाशन प्रशाशनाला निवेदन देऊन आंदोलन करून मार्ग 
निघे ना सध्या आलापल्ली सिरोंचा या मार्गाला जरी का कागदावर माहामार्गाचा दर्जा मिळाला असला तरी खड्यांचे साम्राज्य आहेत नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो 
ही गंभीर समस्या लक्षात घेता राजाराम उप पोलीस स्टेशन प्रभारी रविंद्र भोरे व विजय कोल्हे साहेब चौधरी साहेब सतत दोन दिवस आणि जवानांनी श्रमदानातून व गावकऱ्यांच्या मदतीने गोलाकर्जी ते गुड्डीगुडम या रस्त्यावरती मुरूम टाकून खड्यांचे साम्राज्य बुजवून रस्त्याला सोयीस्कर केला  या वेळी आठ ते दहा पोलीस जवानांनी श्रमदान केले