आलापल्ली:मागील पंधरा दिवसापासून उपचार घेत असलेले तेलंगणा राज्यातील (बेज्जूर) कोत्तागुडम या गावातील 6 जण शस्त्रक्रिये करीता अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील आयुष्यमान भारत रुग्णालयात आले होते शस्त्रक्रिया झाल्यानंतर परत स्वगावी(बेज्जूर )कोत्तागुडम येथे जाण्याकरीता रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती तेव्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी स्वराज्य फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला व स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन आयुष्यमान भारत आलापल्ली येथे गेले व त्यांना आपल्या रुग्णवाहिकेतून तेलंगाना राज्यातील बेज्जूर तालुक्यातील कोत्तागुडम या गावी त्यांना सुखरूप सोडून देण्यात आले सदर रुग्णांनी स्वराज्य फाउंडेशन च्या पदाधिकारी यांचे आभार मानले