माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन
मूलचेरा.:दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातल्या प्रत्येक खेळ हे स्पर्धात्मक ठरत असून या स्पर्धात्मक खेळातही ग्रामीण भागातील युवकांमध्ये जिद्द आणि चिकाटीने स्पर्धा करून प्रत्येक सामना जिंकण्याची कुवत निर्माण झाले असले तरी क्रीडा क्षेत्र हे स्पर्धात्मक खेळातल्या प्रगतीसाठी नाही तर संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनशैली विकसित करण्यासाठी असल्याने क्रीडा क्षेत्रातल्या प्रत्येक खेळाडूंनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी खळावे, असे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.
ते मूलचेरा तालुक्यातील गोमणी जवळील कोडीगाव टोला येथील न्यू स्टार कबड्डी क्लब कडून आयोजित खुले कबड्डी सामन्याचे उदघाटन सोहळ्याप्रसंगी उदघाटनीय सामन्याचे उदघाटक म्हणून बोलत होते.
या कबड्डी सामन्याचे उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबटपल्ली ग्रा.पं. चे सरपंच उमेश कडते, पोलीस पाटील मंगाजी आलम,वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम,उपसरपंच उमेश मोहूर्ले,ग्रा.पं. सदस्य शुभम शेंडे, आल्लापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके,माधव कडते,यशवंत मोहूर्ले,शिवराम निकेसर, सुधाकर निकेसर, राजू निकेसर आदी मान्यवर उपस्तीत होते.
कबड्डी सामन्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते थोरपुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थित क्रीडाप्रेमींना क्रीडा विषयी यथोचित मार्गदर्शन केले.
या कबड्डी सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पंधरा हजार रु.रोख तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दीपक दादा आत्राम यांच्याकडून दहा हजार रु.रोख आणि तृतीय पुरस्कार आंबटपल्ली ग्राम पंचायत कडून पाच हजार रु.असे ठेवण्यात आले.
कबड्डी सामन्याचे उदघाटनिय सोहळ्याचे यशस्वी आयोजनासाठी न्यू स्टार कबड्डी क्लब कोडीगाव टोलाचे सर्व पदाधिकारी व सदस्यगण व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.खेळीमय वातावरणात उदघाटन सोहळा पार पडला.