देशाचा पवित्र ग्रंथ संविधानाचे अनुसरण करावे – लक्ष्मण रत्नम

45

येल्ला: गिता, कुराण, बायबल, त्रिपिटक इ. ग्रंथाचे अनुसरण त्या त्या धर्मातील लोक करतात, मात्र भारतीय संविधान या पवित्र ग्रंथाचे अनुसरण सारे भारतीय करतात आणि ते करायलाच पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सहशिक्षक आयु. लक्ष्मण रत्नम यांनी केले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येल्ला, ता. मूलचेरा येथील शाळेत साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
     कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. दिवाकर उराडे, उपसरपंच ग्रा. पं. येल्ला हे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले की तत्कालीन सी. ई. ओ. मा. ई. झेड. खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात संविधान दिन सन – २०१५ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. आता मात्र महाराष्ट्रातूनच नव्हे, साऱ्या भारतात संविधान दिन साजरा केल्या जाते. याचे श्रेय मा. ई. झेड. खोब्रागडे साहेब यांना जाते.
         कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री तिरुपती आरे, स. शिक्षक श्री के. एम. पुण्यमुर्तीवार आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संचलन पदवीधर शिक्षक श्री के. बी. गुंड तर आभाप्रदर्शन स. शिक्षक श्री सी. एल. मडावी यांनी व्यक्त केले.