आमदार डॉक्टर देवरावजी होळी
*टेंभा व चांभार्डा येथील पाणीपुरवठा योजनांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते भूमिपूजन*
*दिनांक २६/११/२०२२ गडचिरोली*
टेंभा : गडचिरोली तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याच्या उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता आपण जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर करून घेतल्या असून त्या माध्यमातून तालुक्यातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी टेंभा व चांभार्डा येथील पाणीपुरवठा योजनांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.*
*जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या या पाणीपुरवठा योजनांच्या भूमिपूजन प्रसंगी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, भाजपा तालुक्याचे अध्यक्ष रामरतनजी गोहने, पंचायत समितीचे माजी सदस्य श्री शंकर जी नैताम, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, टेंभा येथील सरपंच सौ सुनीताताई भजभुजे, उपसरपंच रामचंद्र कस्तुरे, ग्रामसेवक कोलतेजी, माजी उपसरपंच चुडारामजी समर्थ, चांभार्डाचे सरपंच श्री सुरज उईके , सदस्य चनेकारजी , संदीप आलबनकर, हेमंत गेडाम, आशिष उईके, यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.*
*आपल्या गडचिरोली तालुक्यात ह्या योजना मंजूर करण्यात आल्या असून त्या योजनांचा लाभ आपल्या गडचिरोली तालुक्यातील अनेक गावांना होणार आहे. असे प्रतिपादन यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले.*