विसोरा येथे आदिवासी गोंडी नृत्य स्पर्धेचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उदघाटन

41

विसोरा: देसाईगंज तालुक्यातील विसोरा (सिताबर्डी) येथील आदिवासी समाज बहुउद्देशीय गोटूल समिति, विसोरा (सिताबर्डी) यांच्या सौजन्याने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंती निमित्त आदिवासी समूह गोंडी नृत्ये स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले होते.  या आदिवासी समूह गोंडी नृत्ये स्पर्धेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.  
        याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, ज्ञानदेवजी परशुरामकर माजी न्यायाधीश, आनंदरावजी गेडाम माजी आमदार, खिरसागरजी पा. नाकाडे सभापती कृ.उ.बा.स. आरमोरी, डॉ. विनोदजी नाकाडे मा.जि.प. सदस्य, नानाभाऊ नाकाडे मा.जि.प. सदस्य, एस.आर.पी.एफ. चे समादेशक जांभूळकरजी, रमेशजी कुथे सरपंच, संजयजी करणकर उपसरपंच, डॉक्टर अमोलजी बुद्धे, ऋषीजी नाकाडे तं.मु. अध्यक्ष, अभय नाकाडे,  डॉ. चंद्रकांत नाकाडे, देवाजी नाकाडे, एस.आर.पी. एफ. चे कर्मचारी वृंद तसेच मंडळाचे सदस्य गण व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.