एका महिलेसोबत व्हि.डी ओ.बनवून उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

43

चंद्रपूर: काल चंद्रपूर शहरातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेकडे तक्रार दिली की, काही इसमांनी संगणमत करून काही महिण्यापुर्वी त्यांना फ्लॅटवर बोलवून एका महिलेसोबतचे बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रफीत तयार केली व काही दिवसांनी ती रेकॉर्ड केलेली चित्रफीत तक्रारदार यांना पाठवून ति प्रसारीत करण्याची धमकी देवून 3,00,000/- रू. ची खंडणी उखळली होती.      त्यानंतर पुन्हा खंडणी वसुल करण्याची लालसा निर्माण झाल्याने सदरची चित्रफीत एका अनोळखी इसमास पाठवून त्याचे मार्फतीने तक्रारदार यांना आणखी 50,00,000/- रु.चे खंडणीची मागणी करीत असून त्या अनोळखी इसमाने त्याचे मोबाईलवरून तक्रारदार यांना सदर चित्रफीतीचे स्क्रिनशॉट पाठवून ति चित्रफीत सामाजीक माध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी देत आहे. त्यावर तक्रारदार याने त्याचेकडे पैसे नसल्याचे सांगीतल्याने अनोळखी इसम हा तक्रारदार यांचे कार्यालयात जावून तक्रारदार यांचेकडून 5,00,000/- रू.चा चेक व काही नगदी रक्कमेची मागणी केली आहे अशा प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने कारवाई करणे सबंधाने मा.पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. बाळासाहेब खाडे यांना आदेशीत केल्यावरून त्यांनी खंडणी मागणाऱ्या अनोळखी इसमास पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि. जितेंद्र बोबडे, मगेश भोयर, संदिप कापडे, पोउपनि अतुल कावळे यांचे विशेष पथक स्थापन करून सापळा कारवाई करण्या बाबत आदेशीत केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून काल खंडणी मागणारा इसम  सादीक खॉन रसिक खॉन पठाण यास तक्रारदार यांचेकडून 30,000/- रू. रोख व 5,00,000/- रू. चा चेक घेत असतांना रंगेहात पकडले व त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, सादीक खान याच्या मैत्रीणीने तिचे मोबाईल वरून पाठविले व तिने त्यास संबंधीत उच्च पदस्थ अधिका-यास पाठवुन व भेटुन प्रसारीत करण्याची धमकी देवून पैशाची मागणी करण्यास सांगीते त्यानुसार त्याने सदर कामाकरीता त्याचे नावावर नविन सिम कार्ड घेतले व त्या मोबाईल क्रमांकावरून तकारदाराचे मोबाईलवर व्हॉट्सअॅप द्वारे चित्रफितीचे स्क्रिन शॉट पाठविले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवून प्रकरण संपवायचे असल्यास भेटण्यास प्रवृत्त केले व भेटीमध्ये 50 लाख रू. खंडणीची मागणी केली. तक्रारदाराने ऐवढे पैसे नसल्याचे सांगीतले तेव्हा त्याने पाच लाख रू. चे चेक व असतील तेवढी रोख रक्कम देण्यास सांगीतले. तसेच अधिक चौकशी मध्ये निष्पन्न झाले की, सदरची चित्रफित ही आरोपी झिबल मारोतराव भारसाखरे याने त्याची दुसरी पत्नी (आरोपी) हिचे राहते घरी छुपा कॅमेरा लावुन चित्रफित मध्ये असलेल्या आरोपीत महीलेच्या संगणमताने तक्रारदार यांना घरी बोलावुन बेडरूम मध्ये चित्रीकरण केले होते. त्यावरून आरोपी  सादीक खॉन व झिबल भारसाखरे व त्यांच्या इतर तिन महिला आरोपीत साथीदारांविरुद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्र. 641 / 2022 कलम 384, 385, 34 भा. द.वी. प्रमाणे खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला.