राजाराम :- वनपरीक्षेत्र कार्यालय कमलापूर अंतर्गत कमलापूर परिसरात वाघाचे अस्तित्व आहे. अनेकांना वाघाचे दर्शन घडलेले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही मोठार सायकल ने ये जा करणाऱ्या नागरिकांना वाघाचे दर्शन झाले आहे. हा वाघ जंगली वाघ असून याला कोणत्याही अभयारण्यतुन सोडण्यात आलेला नाही अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जंगल परिसरा शेवरात शेती असल्याने शेतशिवारात जाणे कठीण झाले आहे. या परिसरात पशु पालक जास्त असल्यामुळे जंगलामध्ये चराई साठी जाणे पण कठीण झाले आहे. नागरिकांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही.एस.भोयर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाघाचे अस्तित्व असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.